छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजेंच्या मृत्युनंतर स्वराज्याचे रक्षण करत औरंगजेबाच्या सैन्यासोबतच स्वकीय विरोधकांना ही सळो की पळो करून सोडणारी महाराणी ताराराणी , होळकरशाही सक्षमपणे संभाळत नेत्रदीपक कामगिरी करणारी अहिल्या, "मै मेरी झांसी नहीं दुंगी"चा यल्गार करत शत्रूवर तुटून पडणारी झाशीची राणी, बापाच्या मृत्यूनंतर राजकारणात सक्रिय झालेल्या वारसदार मुलीला गुंगी गुडीया म्हणून हिणवणा-या हिनकस प्रवृत्तीच्या लोकांना धडा शिकवत "आयर्न लेडी" बनलेली इंदिरा गांधी यांच्या प्रमाणेच राजकीय आणि सामाजिक जिवनात लाखो निस्वार्थी मावळ्यांना घेऊन कटकारस्थानी आप्तस्वकीय आणि दर्जाहीन विरोधकांना एकाकी झुंज देत पुरून उरणारी रणरागिणी पंकजाताई यांचा आज (26 जुलै) वाढदिवस आहे.
महाराष्ट्रात अनेक राजकिय नेत्यांचे वारसदार राजकारणात आहेत परंतु बापाची पुण्याई वगळता त्यांच्याकडे स्वतःचं विशेष असं काहीही नाही. मात्र पंकजाताई गोपीनाथराव मुंडे या याबाबतीत अपवाद आहेत. खुप कमी कालावधीत पंकजाताई "लोकनेता" झाल्या आहेत.
लोकनेते मुंडे साहेबांसारख्या लोकप्रिय लोकनेत्याचा वारसा जेवढा मोठा तेवढाच तो काटेरी सुध्दा होता. तत्त्वांशी तडजोड न करता नेहमी सत्यासाठी लढणाऱ्या मुंडे साहेबांना जनतेने भरभरून प्रेम दिले , या कारणामुळे त्यांच्यावर जळणारे अनेक विरोधक सुध्दा तयार झाले. पंकजाताईंना साहेबांच्या वारशामध्ये मध्ये लोकांचे ते प्रेम भरभरून मिळाले त्याचबरोबरच साहेबांचे विरोधक सुध्दा मिळाले. साहेबांच्या पश्चात त्यांची मुलगी हे सर्व सांभाळू शकते का ? असा अनेक राजकिय विश्लेषकांना प्रश्न पडत होता. परंतु आज फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात कर्तबगार मंत्री म्हणून त्यांनी स्वतःला सिध्द केले आहे.
पंकजाताईंच्या कल्पकतेतून साकारलेले जलयुक्त शिवार हे महाराष्ट्र शासनाचे अभियान देशभरात दुष्काळमुक्तीसाठी वरदान ठरले आहे . जलयुक्त शिवार अभियान हि फक्त एक योजना न राहता त्याला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचे तोंडभरून कौतुक करत देशभरात जलयुक्त शिवार चे अनुकरण करण्याच्या सुचना केल्या होत्या. राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश अशा राज्यातील संबंधित मंत्री आणि आधिकार्यांनी या संदर्भात पंकजाताईंची भेट घेत मार्गदर्शन सुध्दा घेऊन त्यांच्या राज्यात जलयुक्त शिवार च्या धर्तीवर अभियान राबवले आहे.
राज्यात कोणत्याही जिल्ह्याच्या तुलनेत बीड जिल्ह्याचा विकास प्रचंड जलदगतीने होत आहे . लोकनेते मुंडे साहेबांच्या स्वप्नपूर्ती चा वसा घेतलेल्या दोन्ही "मुंडे भगिनींनी" अथक परिश्रम घेत बीड जिल्ह्यात रेल्वे आणण्याचे साहेबांचे स्वप्न पुर्ण केले आहे. शिवाय जिल्ह्यात अनेक महामार्ग आणले आहेत , विवीध विकासकामे गतीमान पध्दतीने पूर्णत्वाला जात आहेत.
मराठवाड्याच्या विकासाचा बॅकलाॅग भरुन काढण्यासाठी पंकजाताईंची आग्रही भुमिका राहीली आहे . मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत राज्यात ३५,००० किलोमीटर रस्त्यांचे जाळे उभारण्याचा त्यांचा संकल्प असून टाकाऊ प्लॅस्टीक चा रस्त्यांसाठी ऊपयोग करण्याची अभिनव संकल्पना राबविली जात आहे.
जलयुक्त शिवार अभियानाबरोबरच पंकजाताईंच्या नेतृत्वात पंचायत राज विकेंद्रीकरणात महाराष्ट्र देशात अव्वल स्थानावर आलाय तर इंदिरा आवास योजना आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेबद्दल सुध्दा मोदींच्या केंद्र सरकाराकडून कौतुक होत आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून ग्रामीण महाराष्ट्राच्या दळणवळणाचा नवा अध्याय रचला जातोय . रस्तानिर्मीतीसाठी प्लास्टीकचा वापर करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे.
खरं तर पंकजाताई आणि प्रितमताई या दोन्ही बहिणी राजकारणापासून दूर होत्या त्यांचा दुरवर राजकारणाशी काहीही संबंध नव्हता . प्रितमताईंना साहेबांच्या नंतर अचानक पणे राजकारणात यावे लागले तर पंकजाताईंना साहेबांच्या "जवळचे" लोक गद्दार झाल्याने नाईलाजाने राजकारणात यावं लागलं होतं.आजही ताईंना बदनाम करण्याची सुपारी घेतलेले लोक बिनबुडाचे आरोप करण्यात धन्यता मानतात पण ताई सत्याच्या जोरावर सर्वांशी समर्थपणे लढत आहेत.
लोकनेते मुंडे साहेबांचे स्वप्न पुर्ण करण्याची शपथ घेऊन लोककल्याणासाठी रात्रंदिवस समर्थपणे लढणाऱ्या खंबीर ताईसाहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..!!!
● संदीप नागरगोजे, गंगाखेड ●
Comments
Post a Comment