महाराष्ट्रातील आणि विशेषतः मराठवाड्यातील उसतोड, कष्टकरी समाजाचे आराध्य दैवत आणि श्रध्दा श्रध्दास्थान म्हणजे श्री क्षेत्र भगवानगड .
कष्टकरी उसतोड कामगारांना
ऊर्जा देणार्या भगवानगडा बाबत मागच्या काही दिवसांपासून चर्चेचं गुर्हाळ सुरु झालय.
याची सुरूवात स्व.गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीस स्मृतीस्थळ असलेल्या "गोपीनाथगड" वरून झाली .
१२ डिसेंबर रोजी गोपीनाथगड वर झालेल्या कार्यक्रमात भगवानगडाचे महंत डाॅ.नामदेव शास्त्रींनी पंकजा आता राजकीय निर्णय गोपीनाथगडावरूनच जाहीर करेल असे सुतोवाच दिले होते.
काही दिवसांनी "भगवानगडावरील दसरा मेळावा बंद" अशी बातमी आली आणि भगवान बाबा आणि लोकनेते गोपीनाथ मुंडेंचे अनुयायी भगवानगडाच्या विश्वस्त मंडळाच्या विरोधात भडकले.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय दसरा मेळावा अशी कधी कल्पना सुध्दा गडाच्या भक्तांनी केलेली नव्हती त्यांच्या अचानक जाण्याने त्यांची जागा पंकजा मुंडे यांना घ्यावी लागली . भगवानगडावरून ही पंकजा गडाची कन्या असं जाहीर करण्यात आले होते ..
या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंनी काल भगवानगडावर जावून भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि एकतर्फी निर्णय घोषित करणार्या महंत नामदेव शास्त्री यांचेही चरणस्पर्श करून आपल्या परिपक्वतेची चुणूक दाखवली.
चांगदेवाच्या अहंकाराला मुक्ताबाई ने भिंतीवर बसुन जावून चांगदेवाच्या अहंकाराचे केलेले गर्वहरण या घटनेवरून आठवतेय फरक एवढाच आहे की भगवानगडाचे चांगदेव ज्या वाघावर आरूढ झालेले आहेत तो वाघ फक्त अहंकाराच्याच भुश्याने भरलेला आहे आणि ज्या भिंतीवर पंकजा मुंडे आरूढ होताच भिंतीला पाय फुटले ती भिंत लोकनेते गोपीनाथ मुंडे या राजर्षी च्या वृतस्थ आयुष्याचे लेणं आहे ...
दसरा मेळावा बंद करण्याच्या निर्णयावर भगवानगडाच्या जवळपास सर्वच भक्तांनी कडाडून विरोध केला आहे .. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना ज्यांनी कुणी त्रास दिला त्याला भगवानगडावरून विशेष "प्रसाद" मिळाला आहे हा इतिहास आहे . यामुळे भविष्यात भगवानगडावर दसरा मेळावा होणार का नाही ? आणि नाही झाला तर भगवान बाबा आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे अनुयायी या निर्णयाला स्विकारतील का पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होणार? या प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल. .
काय चुकीच्या प्रतिमा वापरता राव.गल्लत होतेय काहीतरी एवढे मात्र नक्की
ReplyDelete