Skip to main content

इश्वर प्राप्तीसाठी धर्माचं दुकाण बदलायची काय गरज ?

आज ख्रिस्ती मिशनऱ्यांची एक पोस्ट वाचली आणि ३ वर्षापुर्वीचा एक अनुभव आठवला ..

साधारणत: मार्च-एप्रील २०१२ चा हा अनुभव आहे . मी शेतातुन फेरफटका मारुन घरी जात असताना गावातील एका मित्राने आपल्या वाडीत अमेरिकन लोक आले आसल्याचे सांगीतले . मुंबई , औरंगाबाद अशा ठिकाणी विदेशी लोक पर्यटनासाठी येतात परंतु आपल्या गावात असं काय आहे जे पहायला हे  इथं आले असतील ? हा प्रश्न मला पडला आणि मी कुतुहलाने त्यांच्या ठिकाणाकडे निघालो ..

     दुर वरुनच शंभर सव्वाशेंचा घोळका जमा झाल्याचा दिसत होता त्यामुळे त्या मित्रांने सांगीतलेली माहीती खरी असल्याची खात्रीच झाली .  सर्व लोक त्यांच्याकडे कुतुहलाने पाहत असल़्याचे दिसत होते , मारुतीच्या मंदिरासमोर लिंबाच्या झाडाच्या खाली खुर्च्या टाकुन तीन गोऱ्या बाया , एक वीशीतली तरुणी आणि त्यांच्या सोबत आलेला एक भाषा ट्रान्सलेट करुन सांगणारा नागपुरचा ट्रान्लेटर होता .

त्या तीन महिलांच्या मधोमध आमच्या गावातील एका मोतीबिंदु झालेल्या म्हाताऱ्याला बसवण्यात आलं होतं आणि त्या तीन स्त्रीया एका तांब्यात त्यांच्या गळ्यातील येशु चा गंडा टाकुन काही तरी बोलुन त्या तांब्यातील पाणी मोतीबिंदु झालोल़्या म्हाताऱ्याला देत होत्या . यावेळी तो ट्रांन्लेटर तिथल्या माणसांना सांगत होता कि .
" येशु दयाळु आहे , हे पाणी पिल्याने या म्हाताऱ्याला चांगल दिसायला लागेल "

तितक्यात त्याच्या सोबतची मुलगी गाडीतुन मिनरल वाटरच्या बाटल़्या घेवुन आली आणि तीने त्या पाण्याच्या बाटल्या म्हाताऱ्याजवळ खुर्चीवर बसलेल्या त्या स्त्रीयांना दिल्या ..

समोरचं द्रश्य पाहुण मी एकटाच जोरात हसत होतो आणि बाकी लोक वेड्याकडे पहावं तशा नजरेने माझ्याकडे पहात होते . या माझ्या क्रतीमुळे त्यांना घेवुन आलेला ड्रायव्हरने माझ्याकडे येवुन मला काय झालं ते विचारलं मी त्याला काही न बोलता जगातील पाणी ग्लास मध्ये घेवुन त्यातील एका बाईला द्यायला गेलो . "नो थँक्स" म्हणंत ती बाई माझ्याकडे पहात होती तितक्यात तो ट्रान्लेटर आला आणि त्यानं आपल्याला काही शंका आहे का ? असं विचारलं ..

मी होय म्हणुन त्याला मी जे काही विचारेल त्या प्रश्नांची उत्तरे देणार का असं विचारलं त्यावर त्या बाईने त्याला यस म्हणुन होकार दिला ..

मी विचारलेले प्रश्न ज्यावर त्या बाईला एकाचंही उत्तर देता आलं नाही ते माझे प्रश्न असे होते .

प्रश्न :-


* येशु जर दयाळु आहे तर तो फक्त ख्रिश्चन लोकांवरच दया करतो का ? इतरांवर का नाही ?

* इश्वर पण धर्मा धर्मात भेद करतो काय ?

* या म्हाताऱ्याची द्रष्टी किती दिवसांत येईल ?

* हा म्हातारा तुम्ही दिल्याल्या पाण्याने बरा होतो तर तुम्हाला हे हेच पाणी  प्यायला नको का वाटते ?

* सोबत मिनरल वाटर वापरायची गरज काय ? येशु इतरांना द्रष्टी देवु शकतो तल तुम्हाला इथलं पाणी पिल्याने आजार कशाला होईल ?

* यावेळी जर या ठिकाणी एक ख्रिश्चन आणि एक हिंदु मेला तर वरुन न्यायला नेमक कोण येणार आहे ? त्यांना सोबतच घेवुन जातील की वेगवेगळं पार्सल नेतील ?

यावर त्यांची बोबडी ओळली होती ततपप करीत त्या काहीतरी बोलत होत्या , मला गोंजारण्याचा अयशस्वी प्रयत्न पण करत होत्या पण मी सरळ त्यांना सांगीतलं कि बायांनो तुमचं दुकाण दुसरीकडे थाटा कारण तुम्ही देवावर बोलत आहात म्हणुन हे लोक तुमचं ऐकुन घेत आहेत .. इथल्या कुणालाही कल्पना नाही कि तुम्ही या लोकांचा देव खोटा आणि तुमचा खरा म्हणत आहात जर ते यांना कळालं तर हे लोक तुमची आरती करुन पाठवतील त्या आगोदर तुम्ही इथुन निघुन जा . नंतर या गावाच्या रस्त्याकडे पाहु नका .

इश्वर कोणीही असो __ त्याची शिकवणुक चांगल वागण्याचीच आहे आणि त्यानुसार माणसानं माणसासारखं वागने एवढेच खुप आहे . देवाला प्रसन्न करायला धर्माचं दुकाण बदलायची  गरज ती काय ?

माझ्या बोलण्याचा जो घ्यायचा तो अर्थ त्यांनी घेतला आणि दहाव्या मिनीटाला त्यांची गाडी गावाच्या बाहेर पडली होती ....


:- श्री संदीप नागरगोजे

Comments

Popular posts from this blog

कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक...

सदरील लेख हा दै.लोकनेता मध्ये दिनांक १७ फेब २०१८ रोजी प्रसिद्ध झालेला आहे . महाराष्ट्रात अनेक मोठे नेते होऊन गेले / आहेत . बर्‍याच नेत्यांनी आपली पुर्ण ताकद लावून राजकारणात सक्रिय केले परंतु त्यांच्या मुलांना बाप कमाई सोडता आपला स्वतःचा असा वेगळा ठसा काही उमटवता आला नाही . आज त्यातले बरेच सपशेल अपयशी ठरले आहेत तर काही जन तर आपल्या वडिलांच्या राजकीय अपयशाचे कारण सुध्दा बनले आहेत . मात्र लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे वारसदार मात्र याला अपवाद ठरले आहेत . महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय नेत्याच्या वारसदारांपेक्षा मुंडे साहेबांच्या मुलींनी आपले कर्तुत्व सिध्द करून स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पंकजाताईंनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यशील आणि कर्तबगार मंत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे . लोकहिताच्या दृष्टीने दुष्काळमुक्तीसाठी वरदान ठरलेल्या जलयुक्त शिवार सारख्या योजनांमुळे त्यांचे देशभर झालेलं कौतुक हे त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल. जलयुक्त शिवार योजनेचे देशभर फक्त कौतुक झाले नाही तर जलयुक्त शिवार हे दुष्काळमुक्तीचे वरदान म्हणून देशभर त्याचे अनुकरण ...

पोटासाठी संत , झाले कलित बहुत

सध्या रामपाल नावाचा माणुस भारतीय मिडीयाची हेडलाईन झाला आहे . रामपाल , अासाराम , निरमल  असे नावात "राम" असलेले लोकं प्रत्यक्षात मात्र ह'राम' आहेतच परंतु दु:ख तर त्यावेळी होत जेंव्हा अशा लोकांसाठी भोळीभाबडी सर्वसामान्य जनता ढाल बनुन प्राणपणाने लढते . मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला .  कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले . सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका ...

नामांतर चळवळ आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे

२१ एप्रिल १९९४ रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेत एका ऐतिहासिक विधेयकावर चर्चा सुरू होती . हे विधेयक यासाठी ऐतिहासिक होते की  फक्त मराठवाड्यातीलच नाही तर संपूर्ण देशातील शोषित बहुजन समाजाची एक भावना होती की औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले जावे . संपूर्ण सभागृहात सर्वत्र शांतता होती , नामातंर चळवळीस मराठवाडय़ात उग्र रूप प्राप्त झाले होते .मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणे का गरजेचं आहे या विषयी सभागृहात एक आवाज घुमत होता. सर्व सदस्य शांतपणे महाराष्ट्राच्या या तरुण जिगरबाज योध्द्याचे भाषण ऐकत होते. तो आवाज होता लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा . आपल्या भाषणात ते म्हणतात "भारतीय राज्यघटनेने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य सामान्य, शोषित, दलित आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. समाजातील भेदभाव , अस्पृश्यता या विरोधात आवाज उठवाला . समाजातील आर्थिक विषमता दुर करण्यासाठी प्रयत्न केले. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर या शोषित समा...