Skip to main content

भिक नको पण कुत्रा आवर

शिक्षक पात्रता परीक्षा .. अर्थात टिईटी १५ डिसेंबर २०१३  आणि १४ डिसेंबर २०१४ या तारखांना महाराष्ट्र शिक्षक परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षा घेतली , सुरुवातीपासूनच अवाढव्य फीस आकारणी पासून ते पेपर मधील प्रश्नांच्या चुका पाहता शिक्षक पात्रता घेणारे स्वतःच यात " अपात्र " झालेले आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही . भावी शिक्षक हे फक्त प्रयोग करण्याचे साधन होत चालले आहे , कधी कोणता प्रयोग तर दुसराच प्रयोग .. परंतु निष्पत्ती काहीच नाही .

हि पात्रता परीक्षा घेण्यामागचा हेतू अजून स्पष्ट नाही , टिईटि निघाली त्यात सलग दोन वर्ष पात्र होऊन सुद्धा शिक्षक होण्यासाठी सीईटि कधी होणार हा मोठा प्रश्न आहे .

 शिक्षक पात्रता प्रमाणपत्राची वैधता हि ७ वर्ष दिलेली आहे परंतु येणाऱ्या सात वर्षांमध्ये शिक्षक भरती होण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही . शासनाचेही याकडे दुर्लक्षच दिसत आहे , सरकार बदलले तरीही परिस्थिती मात्र "जैसे थे" च आहे .  सरकार या विषयी किती गंभीर आहे याचा प्रत्यय आपल्याला http://mahatet.in/ या टिईटि साठी अधिकृत असलेल्या संकेत स्थळावरून समजेल ,
यामध्ये त्यांनी सूचना टाकलेली आहे ती पाहू .. {"" NOTE : Provisional Answer keys for MAHATET-2014 are made available till 28.12.2014. Send your objection, if any to The Commissioner(MSCE), Maharashtra State Council of Examinations, 17, Dr. Ambedkar Road, Pune-411 001 by Post or Email to mahatet14@gmail.com till 28.12.2014 5.45PM  ""} किती  दिवसांपासून या सूचनेची वैधता संपली आहे  तरीही अजून यात बदल सुद्धा केलेला नाही , संकेतस्थळकडे सुधा लक्ष द्यायला दुर्लक्ष होत असेल तर बाकीच्यांच्या गोष्टींचा विचारच न केलेला बरा ..

काहीही गरज नसताना नको तेवढ्या डीएड कोलेज ची खैरात वाटून बेरोजगारांची संख्या वाढवली , यातच दोन वर्षाचा डिप्लोमा करण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबाचे आर्थिक नियोजन सुधा ढासळले , मधेच शिक्षण संस्थांनी नको तेवढी पिळवणूक केली या अनंत यातना सहन करण्यास एकच अशा शक्ती देत होती , एकच विचार दिलासा देत होता कि मी शिक्षक झाल्यानंतर सर्व व्यवस्थि होईल . परंतु त्या आशेवर सुद्धा शिक्षक भरती बंद झाल्याने पाणी पडले   .

आता शिक्षक होण्याची अशा सुधा मावळलेली होती..  ती सोडून देऊन नव्या जोमाने इतर स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला काहीजण लागले त्यात अनेकांनी यश सुधा मिळवलेले आहे . बाकीच्या स्पर्धापारीक्षांचा अभ्यासक्रम आणि सिईटी/टीईटी चा अभ्यासक्रम यात खूप मोठ्या प्रमाणात भिन्नता आहे .  याच्या अभ्यास करण्याच्या प्रयत्नात दुसर्या परीक्षांचा result  सुधा जातो आहे . या सर्व बाबींवरून   {...भिक नको पण कुत्रा आवर ..}  या मराठी म्हणी प्रमाणे डीएड धारकांची अवस्था झालेली आहे ..  तेंव्हा शिक्षक भरती नाही जरी काढली तरी चालेल पण निदान  वेळोवेळी काहीतरी खुसपट काढून अशा दाखवणे तरी बंद करा एवढीच विनंती ..



   ** संदीप प्रभाकर नागरगोजे **
**** गंगाखेड  , जि :- परभणी ****


Comments

Popular posts from this blog

कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक...

सदरील लेख हा दै.लोकनेता मध्ये दिनांक १७ फेब २०१८ रोजी प्रसिद्ध झालेला आहे . महाराष्ट्रात अनेक मोठे नेते होऊन गेले / आहेत . बर्‍याच नेत्यांनी आपली पुर्ण ताकद लावून राजकारणात सक्रिय केले परंतु त्यांच्या मुलांना बाप कमाई सोडता आपला स्वतःचा असा वेगळा ठसा काही उमटवता आला नाही . आज त्यातले बरेच सपशेल अपयशी ठरले आहेत तर काही जन तर आपल्या वडिलांच्या राजकीय अपयशाचे कारण सुध्दा बनले आहेत . मात्र लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे वारसदार मात्र याला अपवाद ठरले आहेत . महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय नेत्याच्या वारसदारांपेक्षा मुंडे साहेबांच्या मुलींनी आपले कर्तुत्व सिध्द करून स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पंकजाताईंनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यशील आणि कर्तबगार मंत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे . लोकहिताच्या दृष्टीने दुष्काळमुक्तीसाठी वरदान ठरलेल्या जलयुक्त शिवार सारख्या योजनांमुळे त्यांचे देशभर झालेलं कौतुक हे त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल. जलयुक्त शिवार योजनेचे देशभर फक्त कौतुक झाले नाही तर जलयुक्त शिवार हे दुष्काळमुक्तीचे वरदान म्हणून देशभर त्याचे अनुकरण ...

पोटासाठी संत , झाले कलित बहुत

सध्या रामपाल नावाचा माणुस भारतीय मिडीयाची हेडलाईन झाला आहे . रामपाल , अासाराम , निरमल  असे नावात "राम" असलेले लोकं प्रत्यक्षात मात्र ह'राम' आहेतच परंतु दु:ख तर त्यावेळी होत जेंव्हा अशा लोकांसाठी भोळीभाबडी सर्वसामान्य जनता ढाल बनुन प्राणपणाने लढते . मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला .  कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले . सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका ...

नामांतर चळवळ आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे

२१ एप्रिल १९९४ रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेत एका ऐतिहासिक विधेयकावर चर्चा सुरू होती . हे विधेयक यासाठी ऐतिहासिक होते की  फक्त मराठवाड्यातीलच नाही तर संपूर्ण देशातील शोषित बहुजन समाजाची एक भावना होती की औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले जावे . संपूर्ण सभागृहात सर्वत्र शांतता होती , नामातंर चळवळीस मराठवाडय़ात उग्र रूप प्राप्त झाले होते .मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणे का गरजेचं आहे या विषयी सभागृहात एक आवाज घुमत होता. सर्व सदस्य शांतपणे महाराष्ट्राच्या या तरुण जिगरबाज योध्द्याचे भाषण ऐकत होते. तो आवाज होता लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा . आपल्या भाषणात ते म्हणतात "भारतीय राज्यघटनेने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य सामान्य, शोषित, दलित आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. समाजातील भेदभाव , अस्पृश्यता या विरोधात आवाज उठवाला . समाजातील आर्थिक विषमता दुर करण्यासाठी प्रयत्न केले. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर या शोषित समा...