Skip to main content

उतणार नाही , मातणार नाही आणि आयुष्यात कुणापुढे झुकणार नाही

काल परवा मला माझ्या what's app वर एका मित्राने " पंकजाताई जरा सबुरीनं " या शिर्षका खालचा श्री रमेश पतंगे ( जिवनात प्रथमच नाव ऐकले / वाचले ) यांचा पुर्वग्रहदुशीत किंवा आकसयुक्त विचारांतुन लिहीलेल्या पत्राचे कात्रण पाठवले  .

सुरुवातीलाच यानी ना.मुंडे ताईंना लिहीलेल्या पत्रातुन भाजपच्या विजयात "ताईंचाही" मोठा वाटा असल्याचे सांगीतले . नावाबरोबर 'ही' वापरल्याने महाराष्ट्रातील आणखी दुसऱ्या कोणत्यातरी नेत्याचा भरपुर वाटा या रमेश पतंगेंना वाटंत असेल ?  साहेबांनंतर भाजप मध्ये पंकजाताई शिवाय असा कोणता जनाधार असलेला नेता आहे ? हे त्यांनाच माहीती .

 या पत्रांच हसु तर तेंव्हा येते जेंव्हा जागतीक महान लेखक श्री पतंगे सांगतात कि १९९५ च्या वेळी लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी जी संघर्ष यात्रा काढली ती याच रमेशरावांच्या सांगण्यावरुनच . आता या वाक्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा मी माझं डोक आपटुन घेतलेलं बर वाटतं . संघाच आणि स्वत:च मोठेपण सांगत यांनी सामाजीक न्याय आणि समरसता हा समान वैचारीक दुवा सांगत स्वत:ला स्वत:च साहेबांच्या बरोबरीचं करायला सुध्दा यानी मागेपुढे पाहीले नाही ( कोणता आणि कुठे सामाजीक न्याय पतंगेनी दिला ते विचारण्याची आवश्यकता नाही ) . पुढे साहेबांना वारसा हक्काने काहीही मिळाले नसल्याचे सांगत यांनी पंकजाताई यांना कर्तुत्वहिन दाखवण्याचा " बालिश " प्रयत्न केलेला आहे  कदाचीत( या वाक्यातुन त्यांना " साहेब हे मागच्या दाराने कुणाच्या कुबड्या घेवुन किंवा सत्तेसाठी चड्डी चा वापर करुन आलेले नाहीत " सिध्द होतंय याची समज आलेली नसावी ) ़

यांनी आकसापोटी ताईंवर टिका केल्याचे यावरुनच स्पष्ट होतंय कि यांच्या समजानुसार पंकजाताई या ३ महिण्यातच नेत्रत्व करत पुढे आल्या आहेत , ( अर्धवट माहीतीवरुन मंगळाचा शोध लावण्यास निघाल्यासारखा प्रयत्न हा )  महाराष्ट्रात ३ वर्षांपासुन गाजत असलेलं ' लेक वाचवा ' अभियानापासुन ते परळी मतदार संघातील पाणी वाचवण्यासाठी ना.पंकजा मुंडे यांनी केलंल कार्य यांना माहीती नाही ( नंतर कधी दुसऱ्या लेखात ते सविस्तर सांगेनच )

शिवाय वारसा हक्काने काहीही मागु नये असा फुकटचा सल्ला त्यांनी ना.पंकजाताई मुंडेंना दिला ( कदाचीत रमेश पतंगे यांना वर्तमान पत्र वाचण्याची & बातम्या ऐकण्याचा सवय दिसत नाही , कारण काही दिवसापुर्वीच ना.पंकजा मुंडे नी मला अनुकंपा तत्वावर काहीही नकोय जे मिळवायचे ते संघर्ष करुन मिळवेण अस ठासुन सांगितले होते .)

राजकारण कसं करायचे ते दोन-चार ओळी लिहुण यांनी सांगीतलं आहे पत्रकार राजकारण कसं करायचं ते शिकवायला निघालेत पत्रकारीतेपेक्षा " तिकडचाच" जास्त लळा दिसतो पतंगेना. ( म्हणुनच कि काय पत्राच्या सुरुवातीपासुनत स्वत:ची बरोबरी लोकनेते गोपीनाथ मुंडेंशी करत होते )  . परंतु लहाणपणापासुनच लोकनेत्याच्या मांडीवर बसुन राजकारणाचे बाळकडु घेतलेल्या व्यक्तिला पुस्तकं वाचुन राजकारण शिकवणार काय ?

शिवाय कोणता पत्ता कुढे काढायचा हे तुम्ही शिकवण्याची गरज तरी काय आहे  कारण ताईंच्या मास& मेट्रो शब्दांनी अनेकांची झोप उडाली हे उदाहरण समोर आहेच की .

ताईंना समोर करुनच भाजपनं निवडणुक लढवली तरिही जनतेची पसंती पंकजाताई ना नसल्याचे खोटं पण रेटुन सांगीतलं आहे . पक्षाने नरेंद्र मोदी ना मुख्यमंत्री आणि पंतप्रधान केल्याचे रमेश पतंगे पुढे सांगतात , मुख्यमंत्री केलं हे मान्य परंतु यांना लोकसभेची निवडणुक कशी झाली ते सुध्दा माहीती नाही .हे पण मीच सांगतो , लोकसभेचा भाजप नारा होता " अबकी बार मोदी सरकार " या वरुनच स्पष्ट होत की भाजपने मोदींना पंतप्रधान केले का मोदींनी भाजपला सत्तेत आणले ?

काही दिवसांतच पंकजाताई यांचे जनसमर्थन कमी होईल अशी भविष्यवाणी सुध्दा रमेश पतंगे यांनी केली (यावरुन ते जागतीक ख्यातीचे महान ज्योतीषी असल्याचे स्पष्ट होते)
परंतु त्यांना याची कल्पना नाही की काही वर्षांचा अपवाद वगळता मुंडे हे नाव विरोधातच बसले तरिही किंचीतही जनसमर्थन कमी झाले नाही उलट साहेबांनी जाता-जाता ते व्यापक बनवले आहे म्हणुनच साहेबांपेक्षा जास्त लोकं पंकजाताई मुंडेंच्या पाठीमागे खंबीर उभे टाकले . ते मुंडे या नावावर असलेलं निस्वार्थी प्रेम आहे . आणि जिथे स्वार्थच नसतो तिथं मतभेद आणि मनभेद कधीच येत नाहीत  ा

पत्राच्या शेवटी त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याना काय आवडतं आणि आवडत नाही ते सांगीतले आहे .. अहो पतंगे लेकराला काय लागतं ते त्याच्या आई- वडिलांना चांगलच कळतं आणि मुंडेंनी पक्ष स्वत:च्या मुलाप्रमाणेच वाढवलेला आहे म्हणुनच संघाचं मुख्यालय महाराष्ट्रात असताना भाजप म्हणजे फक्त मुंडे असं समीकरणंच होतं , साहेब जनतेला काय लागतं ते पहात होते .

शेवटच्या काही ओळींमध्ये संघाशी जुळवुन घेण्याची अप्रत्यक्षपणे धमकीच रमेश पतंगे यांनी ना.पंकजाताई मुंडे यांना दिली आहे , यांना पंकजाताई यांनी संघर्ष यात्रेत प्रत्येक ठिकाणी  १०० वेळा ठासुन सांगीतलेलं वाक्य एकदाही ऐकलेलं दिसत नाही . ते पण मीच सांगतो " उतणार नाही , मातणार नाही आणि आयुष्यात कधीच कुणापुढे झुकणार नाही :- ना.पंकजाताई गोपीनाथ मुंडे " ( ऐकायचं असेल तर you tube वर संघर्ष यात्रेचे सर्व व्हीडीयो पंकजाताईनी तुम्हा आम्हांसाठी अपलोड करुन ठेवले आहेत )

असो या आणि मागच्या अशा काही उदाहरणांवरुन ना.पंकजाताई गोपीनाथ मुंडे या लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांप्रमाणेच धडाकेबाज आणि लोकाभिमुख राजकारण करत असल्याचे स्पष्ट होते . ताईंना शुभेच्छा ..

:- संदीप नागरगोजे , गंगाखेड

Comments

Popular posts from this blog

कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक...

सदरील लेख हा दै.लोकनेता मध्ये दिनांक १७ फेब २०१८ रोजी प्रसिद्ध झालेला आहे . महाराष्ट्रात अनेक मोठे नेते होऊन गेले / आहेत . बर्‍याच नेत्यांनी आपली पुर्ण ताकद लावून राजकारणात सक्रिय केले परंतु त्यांच्या मुलांना बाप कमाई सोडता आपला स्वतःचा असा वेगळा ठसा काही उमटवता आला नाही . आज त्यातले बरेच सपशेल अपयशी ठरले आहेत तर काही जन तर आपल्या वडिलांच्या राजकीय अपयशाचे कारण सुध्दा बनले आहेत . मात्र लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे वारसदार मात्र याला अपवाद ठरले आहेत . महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय नेत्याच्या वारसदारांपेक्षा मुंडे साहेबांच्या मुलींनी आपले कर्तुत्व सिध्द करून स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पंकजाताईंनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यशील आणि कर्तबगार मंत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे . लोकहिताच्या दृष्टीने दुष्काळमुक्तीसाठी वरदान ठरलेल्या जलयुक्त शिवार सारख्या योजनांमुळे त्यांचे देशभर झालेलं कौतुक हे त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल. जलयुक्त शिवार योजनेचे देशभर फक्त कौतुक झाले नाही तर जलयुक्त शिवार हे दुष्काळमुक्तीचे वरदान म्हणून देशभर त्याचे अनुकरण ...

पोटासाठी संत , झाले कलित बहुत

सध्या रामपाल नावाचा माणुस भारतीय मिडीयाची हेडलाईन झाला आहे . रामपाल , अासाराम , निरमल  असे नावात "राम" असलेले लोकं प्रत्यक्षात मात्र ह'राम' आहेतच परंतु दु:ख तर त्यावेळी होत जेंव्हा अशा लोकांसाठी भोळीभाबडी सर्वसामान्य जनता ढाल बनुन प्राणपणाने लढते . मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला .  कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले . सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका ...

नामांतर चळवळ आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे

२१ एप्रिल १९९४ रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेत एका ऐतिहासिक विधेयकावर चर्चा सुरू होती . हे विधेयक यासाठी ऐतिहासिक होते की  फक्त मराठवाड्यातीलच नाही तर संपूर्ण देशातील शोषित बहुजन समाजाची एक भावना होती की औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले जावे . संपूर्ण सभागृहात सर्वत्र शांतता होती , नामातंर चळवळीस मराठवाडय़ात उग्र रूप प्राप्त झाले होते .मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणे का गरजेचं आहे या विषयी सभागृहात एक आवाज घुमत होता. सर्व सदस्य शांतपणे महाराष्ट्राच्या या तरुण जिगरबाज योध्द्याचे भाषण ऐकत होते. तो आवाज होता लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा . आपल्या भाषणात ते म्हणतात "भारतीय राज्यघटनेने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य सामान्य, शोषित, दलित आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. समाजातील भेदभाव , अस्पृश्यता या विरोधात आवाज उठवाला . समाजातील आर्थिक विषमता दुर करण्यासाठी प्रयत्न केले. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर या शोषित समा...