Skip to main content

Posts

शोषीत बहुजनांचा गड " भगवानगड "

भारतीय संस्क्रतीत "दसरा" या सणाचं खुप महत्व आहे . महाराष्ट्रात दसऱ्याच्या दिवशी संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असायचे ते महाराष्ट्राच्या दोन दिग्गज नेत्यांच्य...

इश्वर प्राप्तीसाठी धर्माचं दुकाण बदलायची काय गरज ?

आज ख्रिस्ती मिशनऱ्यांची एक पोस्ट वाचली आणि ३ वर्षापुर्वीचा एक अनुभव आठवला .. साधारणत: मार्च-एप्रील २०१२ चा हा अनुभव आहे . मी शेतातुन फेरफटका मारुन घरी जात असताना गावातील एका मित्राने आपल्या वाडीत अमेरिकन लोक आले आसल्याचे सांगीतले . मुंबई , औरंगाबाद अशा ठिकाणी विदेशी लोक पर्यटनासाठी येतात परंतु आपल्या गावात असं काय आहे जे पहायला हे  इथं आले असतील ? हा प्रश्न मला पडला आणि मी कुतुहलाने त्यांच्या ठिकाणाकडे निघालो ..      दुर वरुनच शंभर सव्वाशेंचा घोळका जमा झाल्याचा दिसत होता त्यामुळे त्या मित्रांने सांगीतलेली माहीती खरी असल्याची खात्रीच झाली .  सर्व लोक त्यांच्याकडे कुतुहलाने पाहत असल़्याचे दिसत होते , मारुतीच्या मंदिरासमोर लिंबाच्या झाडाच्या खाली खुर्च्या टाकुन तीन गोऱ्या बाया , एक वीशीतली तरुणी आणि त्यांच्या सोबत आलेला एक भाषा ट्रान्सलेट करुन सांगणारा नागपुरचा ट्रान्लेटर होता . त्या तीन महिलांच्या मधोमध आमच्या गावातील एका मोतीबिंदु झालेल्या म्हाताऱ्याला बसवण्यात आलं होतं आणि त्या तीन स्त्रीया एका तांब्यात त्यांच्या गळ्यातील येशु चा गंडा टाकुन काही तरी बो...

महाराष्ट्राचे राजकारण सांगा कुणीकडे जात आहे ?

मित्रांनो सध्या महाराष्ट्रात सत्तचे जे खंजीरीकरण चालु आहे त्यावर सुचलेल्या काही ओळी आपल्यासोबत शेअर करतोय .. आवडलं तर नक्की कळवा .. •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• महाराष्ट्राचे राजकारण सांगा कुणीकडे जात आहे ••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••• छत्रपतींचे नाव घेवुन उघड उघड घात आहे जनतेचा  केलाय विश्वासघात छत्रपतींची ना कुणालाच साथ आहे महाराष्ट्राचे राजकारण सांगा कुणीकडे जात आहे ? सभाग्रहात ज्याचा विरोधीपक्षनेता त्यांचा सभापती काय कसा होत आहे सत्तेत सहभागी आसणाऱ्यांना विरोधीपक्षाचेच काम जास्त आहे महाराष्ट्राचे राजकारण सांगा कुणीकडे जात आहे ? नाकारले होतं ज्यांना जनतेने त्यांना यांचीच छुपी साथ आहे दिसताहेत सगळे फुसके वादे प्रत्यक्षात ना अच्छे दिन ना अच्छी रात आहे महाराष्ट्राचे राजकारण सांगा कुणीकडे जात आहे ? हातात फुल की फुलावर हात ? शेवटी जनता एकटीच अनाथ आहे ठेवलाय आता विश्वास एकदा नंतर सत्याला साथ , अन्यायाला लाथ आहे महाराष्ट्राचे राजकारण सांगा कुणीकडे जात आहे ? सगळ्यांचे खंजीरीकरण पाहुन 'गोवींदबाग' मात्र सुखात आहे महारा...

भिक नको पण कुत्रा आवर

शिक्षक पात्रता परीक्षा .. अर्थात टिईटी १५ डिसेंबर २०१३  आणि १४ डिसेंबर २०१४ या तारखांना महाराष्ट्र शिक्षक परिषदेने शिक्षक पात्रता परीक्षा घेतली , सुरुवातीपासूनच अवाढव्य फीस आकारणी पासून ते पेपर मधील प्रश्नांच्या चुका पाहता शिक्षक पात्रता घेणारे स्वतःच यात " अपात्र " झालेले आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही . भावी शिक्षक हे फक्त प्रयोग करण्याचे साधन होत चालले आहे , कधी कोणता प्रयोग तर दुसराच प्रयोग .. परंतु निष्पत्ती काहीच नाही . हि पात्रता परीक्षा घेण्यामागचा हेतू अजून स्पष्ट नाही , टिईटि निघाली त्यात सलग दोन वर्ष पात्र होऊन सुद्धा शिक्षक होण्यासाठी सीईटि कधी होणार हा मोठा प्रश्न आहे .  शिक्षक पात्रता प्रमाणपत्राची वैधता हि ७ वर्ष दिलेली आहे परंतु येणाऱ्या सात वर्षांमध्ये शिक्षक भरती होण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही . शासनाचेही याकडे दुर्लक्षच दिसत आहे , सरकार बदलले तरीही परिस्थिती मात्र "जैसे थे" च आहे .  सरकार या विषयी किती गंभीर आहे याचा प्रत्यय आपल्याला http://mahatet.in/ या टिईटि साठी अधिकृत असलेल्या संकेत स्थळावरून समजेल , यामध्ये त्यांनी सूचना टाकलेली आहे ती...

श्रध्देच्या आडुन अंधश्रध्देचा धंदा .

सोरटी सोमनाथ .. १२,ज्योतीर्लींगांपैकी एक ज्योतीर्लींग ... अनेकवेळा परकिय शत्रुंनी उध्वस्थ करुनही भगवान सोमनाथांचे मंदीर अगदी थाटामाटात उभं आहे . उत्तम कलाक्रती ,भव्यता आणि समुद्र किनारा यामुळे हे वैभव अाणखीनच शोभुन दिसते . परवाला मित्रांना घेवुन सोमनाथ ला गेलो होतो .. दर्शन घेतल्यानंतर आजुबाजुची काही ठिकाणांना भेटी देण्याचा प्रोग्राम ठरला आणि सकाळी आठ वाजताच दर्शन आटोपुन आम्ही तिथला एक अँटो भाड्याने करुन पुढे परशुराम मंदिर , गीता मंदीर , बलराम मंदीर ,भालका तिर्थ  , सुर्यमंदीर , पांडव गुहा अशा ठिकाणांच्या दिशेने निघालो ... या पैकी सुर्यमंदीरातला अनुभव वेगळांच होता तिथं एक देवबाप्पा बसला होता येणाऱ्या प्रत्येकाला तो त्याच्या जवळील १० रुपयाच्या गंडा दोरा देत पिडा , रोग नाहीसे होतात संकटे नाहीसे होतात धनप्राप्ती होते असं सांगत होता . त्याचं हे सर्व कार्य मी १० मीनीटांपासुन पाहत होतो , अगदी त्याच्यासमोर उभा राहुनच हे मी पहात होतो न राहुन त्यानंच विचारलं " साब कँहासे हो ?" मी महाराष्ट्र म्हणुन उत्तर दिले . आपको ये लेना है क्या ? मी नाही म्हणालो . माझं " नही लेना ...

२०१४ संक्षिप्त डायरी & २०१५ नवीन वर्षासाठी संकल्प

        ••• २०१४ संक्षीप्त डायरी •••   आणि   ••• २०१५ नवीन वर्षासाठी संकल्प •••• २०१४ हे खुप सारे अनुभव दिलेलं वर्ष , खुप काही शिकवुन गेलेलं वर्ष . मित्रांनो खर सांगायच झालं तर जीवनातील प्रत्येक दिवसच काय प्रत्येक क्षण हा एकदाच येत असतो परंतु बहुदा नवीन वर्ष सुरुवात होत असताना दिवस कसे निघुन गेले  याची अवलोकन करण्याची संधी येते , वर्षभर केलेली कामे , घडलेल्या घटना , झालेल्या चुका यांच सिंहावलोकन करुन योग्य ते उपाय करण्याची योजना बनवता येते  . माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर हे वर्ष  खुप अनुभवमिश्रीत ठरलं वेळोवेळी माझ्या मित्रांनी , मार्गदर्शकांनी मला सहकार्य केलं  योग्य ते सल्ले दिले माझ्या जीवनातील नव्या टप्यात मी चांगल्या प्रकारे जम बसवण्यात यशस्वी झालो ते माझ्या मित्र आणि हितचिंतकांमुळेच त्यांचा मी आभार मानण्यापेक्षा सदैव त्यांच्या ऋणातच राहणे पसंद करीन . सर्वांचे नाव लिहीण्याची मनापासुन इच्छा आहे परंतु यादी खुप मोठी असल्याने लिहीनं शक्य नाही . त्याच बरोबर ३ जुन २०१४ हा आयुष्यात कधीच विसरता न येणारा दिवसही याच वर्षातला या दिव...

पोटासाठी संत , झाले कलित बहुत

सध्या रामपाल नावाचा माणुस भारतीय मिडीयाची हेडलाईन झाला आहे . रामपाल , अासाराम , निरमल  असे नावात "राम" असलेले लोकं प्रत्यक्षात मात्र ह'राम' आहेतच परंतु दु:ख तर त्यावेळी होत जेंव्हा अशा लोकांसाठी भोळीभाबडी सर्वसामान्य जनता ढाल बनुन प्राणपणाने लढते . मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला .  कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले . सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका ...