Skip to main content

महाराष्ट्राचे राजकारण सांगा कुणीकडे जात आहे ?

मित्रांनो सध्या महाराष्ट्रात सत्तचे जे खंजीरीकरण चालु आहे त्यावर सुचलेल्या काही ओळी आपल्यासोबत शेअर करतोय .. आवडलं तर नक्की कळवा ..
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
महाराष्ट्राचे राजकारण सांगा कुणीकडे जात आहे
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
छत्रपतींचे नाव घेवुन
उघड उघड घात आहे
जनतेचा  केलाय विश्वासघात
छत्रपतींची ना कुणालाच साथ आहे
महाराष्ट्राचे राजकारण
सांगा कुणीकडे जात आहे ?

सभाग्रहात ज्याचा विरोधीपक्षनेता
त्यांचा सभापती काय कसा होत आहे
सत्तेत सहभागी आसणाऱ्यांना
विरोधीपक्षाचेच काम जास्त आहे
महाराष्ट्राचे राजकारण
सांगा कुणीकडे जात आहे ?

नाकारले होतं ज्यांना जनतेने
त्यांना यांचीच छुपी साथ आहे
दिसताहेत सगळे फुसके वादे प्रत्यक्षात
ना अच्छे दिन ना अच्छी रात आहे
महाराष्ट्राचे राजकारण
सांगा कुणीकडे जात आहे ?

हातात फुल की फुलावर हात ?
शेवटी जनता एकटीच अनाथ आहे
ठेवलाय आता विश्वास एकदा
नंतर सत्याला साथ , अन्यायाला लाथ आहे
महाराष्ट्राचे राजकारण
सांगा कुणीकडे जात आहे ?

सगळ्यांचे खंजीरीकरण पाहुन
'गोवींदबाग' मात्र सुखात आहे
महाराष्ट्राचे राजकारण
सांगा कुणीकडे जात आहे ?
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
कवी :- श्री संदीप नागरगोजे , गंगाखेड
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Comments

Popular posts from this blog

पोटासाठी संत , झाले कलित बहुत

सध्या रामपाल नावाचा माणुस भारतीय मिडीयाची हेडलाईन झाला आहे . रामपाल , अासाराम , निरमल  असे नावात "राम" असलेले लोकं प्रत्यक्षात मात्र ह'राम' आहेतच परंतु दु:ख तर त्यावेळी होत जेंव्हा अशा लोकांसाठी भोळीभाबडी सर्वसामान्य जनता ढाल बनुन प्राणपणाने लढते . मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला .  कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले . सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका ...

नामांतर चळवळ आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे

२१ एप्रिल १९९४ रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेत एका ऐतिहासिक विधेयकावर चर्चा सुरू होती . हे विधेयक यासाठी ऐतिहासिक होते की  फक्त मराठवाड्यातीलच नाही तर संपूर्ण देशातील शोषित बहुजन समाजाची एक भावना होती की औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले जावे . संपूर्ण सभागृहात सर्वत्र शांतता होती , नामातंर चळवळीस मराठवाडय़ात उग्र रूप प्राप्त झाले होते .मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणे का गरजेचं आहे या विषयी सभागृहात एक आवाज घुमत होता. सर्व सदस्य शांतपणे महाराष्ट्राच्या या तरुण जिगरबाज योध्द्याचे भाषण ऐकत होते. तो आवाज होता लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा . आपल्या भाषणात ते म्हणतात "भारतीय राज्यघटनेने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य सामान्य, शोषित, दलित आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. समाजातील भेदभाव , अस्पृश्यता या विरोधात आवाज उठवाला . समाजातील आर्थिक विषमता दुर करण्यासाठी प्रयत्न केले. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर या शोषित समा...

गोष्ट नवी रित जुनी ....

                         राजकारणात नैतिकतेच्या गोष्टी नेहमीच विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून का केल्या जातात? सत्तेच्या शिखरावर पोहोचल्यानंतर मात्र या नैतिकतेला राज...