Skip to main content

श्रध्देच्या आडुन अंधश्रध्देचा धंदा .

सोरटी सोमनाथ .. १२,ज्योतीर्लींगांपैकी एक ज्योतीर्लींग ...

अनेकवेळा परकिय शत्रुंनी उध्वस्थ करुनही भगवान सोमनाथांचे मंदीर अगदी थाटामाटात उभं आहे . उत्तम कलाक्रती ,भव्यता आणि समुद्र किनारा यामुळे हे वैभव अाणखीनच शोभुन दिसते .

परवाला मित्रांना घेवुन सोमनाथ ला गेलो होतो .. दर्शन घेतल्यानंतर आजुबाजुची काही ठिकाणांना भेटी देण्याचा प्रोग्राम ठरला आणि सकाळी आठ वाजताच दर्शन आटोपुन आम्ही तिथला एक अँटो भाड्याने करुन पुढे परशुराम मंदिर , गीता मंदीर , बलराम मंदीर ,भालका तिर्थ  , सुर्यमंदीर , पांडव गुहा अशा ठिकाणांच्या दिशेने निघालो ...

या पैकी सुर्यमंदीरातला अनुभव वेगळांच होता तिथं एक देवबाप्पा बसला होता येणाऱ्या प्रत्येकाला तो त्याच्या जवळील १० रुपयाच्या गंडा दोरा देत पिडा , रोग नाहीसे होतात संकटे नाहीसे होतात धनप्राप्ती होते असं सांगत होता .
त्याचं हे सर्व कार्य मी १० मीनीटांपासुन पाहत होतो , अगदी त्याच्यासमोर उभा राहुनच हे मी पहात होतो न राहुन त्यानंच विचारलं " साब कँहासे हो ?" मी महाराष्ट्र म्हणुन उत्तर दिले . आपको ये लेना है क्या ? मी नाही म्हणालो . माझं " नही लेना " उत्तर ऐकताच त्याची बोलण्याची पध्दत एकदमच बदलली होती. कदाचीत सुरुवातीस " साब " म्हणुनही त्याचा उद्देश सफल झालेला नव्हता . दुसऱ्याच सेकंदाला त्याने उध्दट स्वरात बोलला  " इतनी देर तक क्या मेरा मुँह देख रहे हो क्या साब ? बाकी लोगोंको भी दर्शन करना है भगवान का '.( लोकांची गर्दी खुप विरळ होती हे महत्वाचं इथे )
मी हसतच म्हणालो " भटजी आप तो अंतरज्ञानी हो ' मै आपका मुँह ही देख रहा था " आपके चेहरे से तो लगता नही की आपके सारे कष्ट चले गये है , आपके ग्हमान मुझे अच्छे नही लगते है , आप के उपर शनी महाराज की क्रपा नही है " ...  एवढे दोन चार वाक्य ऐकुन त्याचा चेहरा थोडासा चिरमटल्यासारखा झालेला होता ...

" आप क्या बोलना चाहते है ?" त्यांने विचारले .
आप लोगोके दु:ख , संकट दुर कर सकते हो तो खुदके क्युँ नही ? मी वीचारलं ...सिर्फ दस रुपयो मे तुम ये सब करते हो फिर खुद के हात मे ये धागा क्युँ नही बाँधा है तुमने ? माझं दुसरं वाक्य ही लगेच बोलुन झाल्यानंतर मी लगेच दहा रुपये काढले आणि त्याला दिले आणि म्हणालो  " ये रखलो और इस पैसे का धागा पहले अपने हात मे बाँधले और बादमे औरोको ये बेच ..

त्याचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता त्याला काही बोलनं सुचत नव्हते तितक्यात पुढे गेलेला एक मित्र मला शोधत वापस आला . आणि इतर दोन चार लोक जे आमचं बोलनं ऐकत थांबले होते त्यांना पाहुन ",क्या हुवा ?" म्हणुन त्याने विचारले ..

लगेच शांत बसलेल्या देवबाप्पा ला पुन्हा वाचा फुटली आणि त्यांचे शब्द ऐकु आले  " पता नही लोग भगवान के लिए आते है या टाईमपास करणे "

मंदीरातुन बाहेर निघालेलो मी पुन्हा आत गेलो आणि म्हणालो " भटजी हम भगवान के लिए ही आते है आपके धागे खरीदने नही आते , ये श्रध्दा के साथ अंधश्रध्दा का धंदा मत बेचो " मंदीर दर्शन के लिए होता है , तुम्हारी दुकान चलाने नही ........................

बाहेर आल्यानंतर तिथलाच दर्शनासाठी आलेला एक व्यक्ती मला म्हणाला भैया आपणे सही बोला इनको ऐसाही करना चाहीए .सहजच पुर्वी कुठेतरी वाचलेला  प्रसंग आठवला ( कदाचीत सहा सोनेरी पाने पुस्तकातील असेल , परंतु खात्रीने सांगता येत नाही ) कि याच सोमनाथ मंदीरावर ज्या वेळी दुश्मनांनी आक्रमण केलं होतं ( कदाचीत मोहमद गझणी चं सैन्य होतं ते ) या आक्रमणाच्या विरोधात जेंव्हा मंदीराच्या रक्षणार्थ आपले सैन्य उतरले त्यावेळी सोमनाथ मंदीरातील पुजाऱ्यांनीच आपल्याच सैन्याला आडवल्याचे आणि नंतर दुश्मनांनी सर्व मंदीर उध्वस्थ केल्याचे वाचलेले होते .

कदाचीत पुर्वी त्या पुजाऱ्यांनी जे काम केलं तेच त्यांचे वंशज करताहेत का ? असा प्रश्न पडल्यावाचुन रहात नाही .
 पुर्वजांमुळे मंदीर उध्वस्थ होण्याची वेळ आली आणि आताच्या काही लोकांमुळे आमच्या धर्मावर पीके सारखे चित्रपट बनवुन आमच्याधर्माची खिल्ली उडवण्याची वेळ आली .

असो बाकी सोमनाथ मंदीर पाहुण आणि सुमधुर अशी आरती ऐकुण मन प्रसन्न झाले .


:- संदीप नागरगोजे , गंगाखेड

Comments

Popular posts from this blog

कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक...

सदरील लेख हा दै.लोकनेता मध्ये दिनांक १७ फेब २०१८ रोजी प्रसिद्ध झालेला आहे . महाराष्ट्रात अनेक मोठे नेते होऊन गेले / आहेत . बर्‍याच नेत्यांनी आपली पुर्ण ताकद लावून राजकारणात सक्रिय केले परंतु त्यांच्या मुलांना बाप कमाई सोडता आपला स्वतःचा असा वेगळा ठसा काही उमटवता आला नाही . आज त्यातले बरेच सपशेल अपयशी ठरले आहेत तर काही जन तर आपल्या वडिलांच्या राजकीय अपयशाचे कारण सुध्दा बनले आहेत . मात्र लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे वारसदार मात्र याला अपवाद ठरले आहेत . महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय नेत्याच्या वारसदारांपेक्षा मुंडे साहेबांच्या मुलींनी आपले कर्तुत्व सिध्द करून स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पंकजाताईंनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यशील आणि कर्तबगार मंत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे . लोकहिताच्या दृष्टीने दुष्काळमुक्तीसाठी वरदान ठरलेल्या जलयुक्त शिवार सारख्या योजनांमुळे त्यांचे देशभर झालेलं कौतुक हे त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल. जलयुक्त शिवार योजनेचे देशभर फक्त कौतुक झाले नाही तर जलयुक्त शिवार हे दुष्काळमुक्तीचे वरदान म्हणून देशभर त्याचे अनुकरण ...

पोटासाठी संत , झाले कलित बहुत

सध्या रामपाल नावाचा माणुस भारतीय मिडीयाची हेडलाईन झाला आहे . रामपाल , अासाराम , निरमल  असे नावात "राम" असलेले लोकं प्रत्यक्षात मात्र ह'राम' आहेतच परंतु दु:ख तर त्यावेळी होत जेंव्हा अशा लोकांसाठी भोळीभाबडी सर्वसामान्य जनता ढाल बनुन प्राणपणाने लढते . मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला .  कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले . सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका ...

गोष्ट नवी रित जुनी ....

                         राजकारणात नैतिकतेच्या गोष्टी नेहमीच विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून का केल्या जातात? सत्तेच्या शिखरावर पोहोचल्यानंतर मात्र या नैतिकतेला राज...