Skip to main content

'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' आणि 'झिरो डार्क थर्टी'

18 सप्टेंबर 2016 रोजी जम्मू काश्मीर मधील 'उरी' सेक्टर येथे पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी दहशतवादी हल्ला केला होता. चार दहशतवाद्यांनी एलओसी च्या जवळ असलेल्या भारतीय सैन्याच्या स्थानिक मुख्यालय मध्ये शिरून आपल्या झोपेत असलेल्या जवानांवर हल्ला केला होता. यात भारताचे जवळपास 18 जवान शहीद झाले होते. हा हल्ला करणारे चार ही दहशतवादी भारतीय सैन्याने मारले होते परंतु तेवढ्यावरच समाधान होणार नव्हते, कारण यामध्ये आपले 18 जवान आपण गमावले होते, सोबतच हा हल्ला मागच्या वीस वर्षातील सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता.

पाकिस्तानी दहशतवाद्यांची 'कडी निंदा' करणे,  'पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी' घालणे, संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तान विरोधात पुरावे देणे, या आणि अशा नेहमीच्या गोष्टींपेक्षा काहीतरी वेगळं करणे भाग होते आणि म्हणून 'उरी दहशतवादी हल्ल्याचा' बदला म्हणून भारताने पाकव्याप्त काश्मीर मध्ये घुसून "सर्जिकल स्ट्राईक" करण्याची योजना आखली होती.. पाकव्याप्त काश्मीर मध्ये घुसून भारत विरोधी करवाह्या करणाऱ्या आतंकवाद्यांना यमसदनी पाठवणे आणि 'उरी' हल्ल्याचा बदला घेणे हा "सर्जिकल स्ट्राईक" चा उद्देश होता.

यावरच आधारित बहूचर्चित चित्रपट "उरी : द सर्जिकल स्ट्राईक" काल पहिला. मनोरंजनात्मक चित्रपटांपेक्षा सत्य घटनेवर आधारारीत चित्रपट मला जास्त आवडतात, तुम्हालाही आवडत असतील. आणि जर ती सत्य घटना आपल्या जवानांनी देशासाठी केलेल्या पराक्रमाची असेल तर त्याहून अधिक काही असू शकेल असं वाटत नाही..  हा चित्रपट पाहताना चित्रपटाच्या सुरुवातीपासून ते चित्रपटाचा शेवट होईपर्यंत एक मिनिट सोडा एक सेकंद सुद्धा लक्ष विचलित होत नाही. ( The Accidental PM पाहताना माझ्या मित्राने दीड तास झोप घेतली होती..)

चित्रपटाच्या मुख्य भूमिकेतील विकी कौशल, यामिनी गौतम, परेश रावल, मोहित रैना, कीर्ती कुल्हारी या सर्वच कलाकारांनी आपल्या भूमिकेला यथोचित न्याय दिलेला आहे. (सुरुवातीला परेश रावल यांची भूमिका अजून चांगल्या प्रकारे करता आली असती असं वाटायला लागतं, पण पुढे   त्यांनी अजित डोबाल चांगल्या प्रकारे साकारले आहेत..)

हा चित्रपट पहिल्या नंतर मला हॉलिवूड च्या "झिरो डार्क थर्टी" या चित्रपटाची आवर्जून आठवण अली .. ज्यांनी ज्यांनी तो पाहिलेला आहे त्या सर्वांना झाली असेल. 'ओसामा बिन लादेन' चा शोध करण्यापासून ते लादेन ला एबोटाबाद येथील घरात घुसून "ऑपरेशन जेरोनिमो" करून कशाप्रकारे कंठस्नान घातले ते या झिरो डार्क थर्टी चित्रपटात दखवलेलं आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जवळपास 90% शूटिंग भारतात झालेलं आहे..

या दोन्ही चित्रपटांची मला तुलना अजिबात करायची नाही , परंतु एवढं मात्र नक्की आहे की 'झिरो डार्क थर्टी' आणि 'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' हे दोन्ही चित्रपट पाहिल्यानंतर आपल्याला एवढं मात्र नक्कीच लक्षात येते की अल कायदा चा म्होरक्या ओसामा बिन लादेन ला मारण्यासाठी अमेरिकेने राबवलेल्या 'ऑपरेशन जेरोनिमो' पेक्षा भारताने केलेले सर्जिकल स्ट्राईक कुठल्याही बाबतीत कमी नव्हते.. फरक एवढाच आहे की अमेरिकेच्या सैन्याने पाकिस्तान मध्ये राहून लादेन ला मारले.. आणि आपण पाकव्याप्त काश्मीर मध्ये घुसून दहशतवाद्यांना ठोकले..

- संदीप नागरगोजे, गंगाखेड

Comments

Popular posts from this blog

पोटासाठी संत , झाले कलित बहुत

सध्या रामपाल नावाचा माणुस भारतीय मिडीयाची हेडलाईन झाला आहे . रामपाल , अासाराम , निरमल  असे नावात "राम" असलेले लोकं प्रत्यक्षात मात्र ह'राम' आहेतच परंतु दु:ख तर त्यावेळी होत जेंव्हा अशा लोकांसाठी भोळीभाबडी सर्वसामान्य जनता ढाल बनुन प्राणपणाने लढते . मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला .  कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले . सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका ...

नामांतर चळवळ आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे

२१ एप्रिल १९९४ रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेत एका ऐतिहासिक विधेयकावर चर्चा सुरू होती . हे विधेयक यासाठी ऐतिहासिक होते की  फक्त मराठवाड्यातीलच नाही तर संपूर्ण देशातील शोषित बहुजन समाजाची एक भावना होती की औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले जावे . संपूर्ण सभागृहात सर्वत्र शांतता होती , नामातंर चळवळीस मराठवाडय़ात उग्र रूप प्राप्त झाले होते .मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणे का गरजेचं आहे या विषयी सभागृहात एक आवाज घुमत होता. सर्व सदस्य शांतपणे महाराष्ट्राच्या या तरुण जिगरबाज योध्द्याचे भाषण ऐकत होते. तो आवाज होता लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा . आपल्या भाषणात ते म्हणतात "भारतीय राज्यघटनेने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य सामान्य, शोषित, दलित आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. समाजातील भेदभाव , अस्पृश्यता या विरोधात आवाज उठवाला . समाजातील आर्थिक विषमता दुर करण्यासाठी प्रयत्न केले. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर या शोषित समा...