Skip to main content

Posts

“सत्तेच्या ऊन्मादातुन आलेली कृतघ्नता आणि ऊसन्या आवेशांचे ओंगाळवाणे प्रदर्शन”

तुलना होणं अवाजवी नक्कीच नाही. गृहखात्याने भगवानगडावर सभेला परवानगी नाकारल्याने अवघ्या 3 दिवसांत संत भगवानबाबा यांची जन्मभुमी सावरगाव येथील गावकऱ्यांच्या आमंत्रणानंतर ना.पंकजाताईंचा दसरा मेळावा सहा महिन्यांपुर्वी ऊत्स्फुर्त जनसागराच्या ऊपस्थितीत पार पडला. सावरगाव कुठे आहे हे माहिती नसताना चार ते पाच लाख लोक पंकजाताईंच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून आडवळणाच्या या गावी आले. परवा भाजपचा वर्धापनदिन बीकेसी ग्राऊंड, मुंबई येथे पार पडला. 28 विशेष रेल्वे गाड्यांची बुकींग(ऑफिशियल खर्चआहे ५कोटी!) 50,000 बसेस भाड्याने,राज्यभरातून प्रत्येक आमदार,खासदार ,मंत्र्यांना कामाला लावून  किमान 3 लाख लोक सभेला उपस्थित रहायलाच हवे असे 'टार्गेट' असताना पोलीस अंदाजानुसार त्याहुनही कमी लोक सभेला उपस्थित होते! त्यातही फुसक्या भेसुर भाषणांऐवजी ही सभा पुन्हा गाजवली दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडेंनीच. 38 वर्षांपुर्वी अटलबिहारी वाजपेयींनी मुंबई येथील पक्षाच्या अधिवेशनात “अंधेरा छटेगा-कमल खिलेगा” असे भाकीत केले होते. आज सत्ताकारणाच्या गोळाबेरजेमध्ये संख्यात्मक दृष्ट्या जरी “कमल खिलेगा” सत्य झालेले दिसत असल...

कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक...

सदरील लेख हा दै.लोकनेता मध्ये दिनांक १७ फेब २०१८ रोजी प्रसिद्ध झालेला आहे . महाराष्ट्रात अनेक मोठे नेते होऊन गेले / आहेत . बर्‍याच नेत्यांनी आपली पुर्ण ताकद लावून राजकारणात सक्रिय केले परंतु त्यांच्या मुलांना बाप कमाई सोडता आपला स्वतःचा असा वेगळा ठसा काही उमटवता आला नाही . आज त्यातले बरेच सपशेल अपयशी ठरले आहेत तर काही जन तर आपल्या वडिलांच्या राजकीय अपयशाचे कारण सुध्दा बनले आहेत . मात्र लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांचे वारसदार मात्र याला अपवाद ठरले आहेत . महाराष्ट्रात इतर कोणत्याही राजकीय नेत्याच्या वारसदारांपेक्षा मुंडे साहेबांच्या मुलींनी आपले कर्तुत्व सिध्द करून स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. पंकजाताईंनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील सर्वात कार्यशील आणि कर्तबगार मंत्री म्हणून नावलौकिक मिळवला आहे . लोकहिताच्या दृष्टीने दुष्काळमुक्तीसाठी वरदान ठरलेल्या जलयुक्त शिवार सारख्या योजनांमुळे त्यांचे देशभर झालेलं कौतुक हे त्याचंच एक उदाहरण म्हणता येईल. जलयुक्त शिवार योजनेचे देशभर फक्त कौतुक झाले नाही तर जलयुक्त शिवार हे दुष्काळमुक्तीचे वरदान म्हणून देशभर त्याचे अनुकरण ...

गोपीनाथराव मुंडे : मरणोपरांतही कर्तुत्वाची सर्वव्यापक आभा

अनेक नेते जन्माला येतात , मोठ मोठ्या पदावर कार्य करतात , यशाची नवनवी शिखरे सुध्दा गाठतात परंतु एकदा का त्यांची खुर्ची गेली की लोकांच्या विस्मृतीत जायला त्यांना वेळ लागत नाही . मरणोपरांत तर अशा नेत्यांचे नाव लोकांच्या तोंडी राहणे तर अशक्यच , परंतु लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांसारखी काही मोजक्या विभुती याला अपवाद असतात . म्हणूनच मुंडे साहेबांसारख्या नेत्यांना 'लोकनेता' हि पदवी लागलेली असते , नेता आणि लोकनेता या शब्दांमधला हाच काय तो एकमेव आणि महत्वाचा फरक सांगता येईल. साहेबांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यासाठी शब्द कमी पडतात , आजवर मुंडे साहेबांच्या कार्यावर भरपूर लेखन झालेलं आहे , पुढेही होत राहील परंतु त्यांचे मोठेपण शब्दांत व्यक्त करता येणार नाही . एका छोट्याश्या खेडेगावातून जन्माला आलेल्या मुंडे साहेबांनी गेल्या चार दशकांपासून महाराष्ट्रातल्या गोरगरीब , कष्टकरी , शेतकरी, शोषित बहुजन समाजातील लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे . कारण मुंडे साहेबांच्या बोलण्यात आणि आचरणात काहीही फरक नसायचा ; ते जे बोलायचे तेच करायचे .साहेबांनी  सत्ता आणि स्वार्थासाठी स्वतःच्या ...

स्वाभिमानी संघर्षाचा वारसा नव्हे 'वसा', महाराष्ट्राच्या भाग्यरेषेवर पंकजाताईंचा ठसा..

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजेंच्या मृत्युनंतर स्वराज्याचे रक्षण करत औरंगजेबाच्या सैन्यासोबतच स्वकीय विरोधकांना ही सळो की पळो करून सोडणारी महाराणी तारारा...

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने..

आज गुरुपौर्णिमा...  गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या शेकडो पोस्टांनी फेसबुक भरून गेलेले आहे . माझ्याही आयुष्यात मला घडवणारे अनेक गुरूजन लाभले , आई - वडिल - मोठा भाऊ यां...

संघर्षयात्रा विरुद्ध संसर्गयात्रा .

गोपीनाथ मुंडे ; महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात स्वयंकर्तुत्वाने आणि स्वाभिमानाने स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणारा लोकनेता. तसं पाहता महाराष्ट्रात इतरांच्या पा...

महाराष्ट्राचे सर्वोत्तम गृहमंत्री : लोकनेते गोपीनाथराव मुंडे

गोपीनाथगड.... परळी वैजनाथ जवळील लोकनेते मुंडे साहेबांच्या या समाधीस्थळाला गेल्या दोन वर्षांपासुन १२ डिसेंबर रोजी भव्य यात्रेचे स्वरूप प्राप्त होत आहे. १२ डिसेंबर हा लो...