Skip to main content

Posts

गोपीनाथराव मुंडे : मरणोपरांतही कर्तुत्वाची सर्वव्यापक आभा

अनेक नेते जन्माला येतात , मोठ मोठ्या पदावर कार्य करतात , यशाची नवनवी शिखरे सुध्दा गाठतात परंतु एकदा का त्यांची खुर्ची गेली की लोकांच्या विस्मृतीत जायला त्यांना वेळ लागत नाही . मरणोपरांत तर अशा नेत्यांचे नाव लोकांच्या तोंडी राहणे तर अशक्यच , परंतु लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांसारखी काही मोजक्या विभुती याला अपवाद असतात . म्हणूनच मुंडे साहेबांसारख्या नेत्यांना 'लोकनेता' हि पदवी लागलेली असते , नेता आणि लोकनेता या शब्दांमधला हाच काय तो एकमेव आणि महत्वाचा फरक सांगता येईल. साहेबांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यासाठी शब्द कमी पडतात , आजवर मुंडे साहेबांच्या कार्यावर भरपूर लेखन झालेलं आहे , पुढेही होत राहील परंतु त्यांचे मोठेपण शब्दांत व्यक्त करता येणार नाही . एका छोट्याश्या खेडेगावातून जन्माला आलेल्या मुंडे साहेबांनी गेल्या चार दशकांपासून महाराष्ट्रातल्या गोरगरीब , कष्टकरी , शेतकरी, शोषित बहुजन समाजातील लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे . कारण मुंडे साहेबांच्या बोलण्यात आणि आचरणात काहीही फरक नसायचा ; ते जे बोलायचे तेच करायचे .साहेबांनी  सत्ता आणि स्वार्थासाठी स्वतःच्या ...

स्वाभिमानी संघर्षाचा वारसा नव्हे 'वसा', महाराष्ट्राच्या भाग्यरेषेवर पंकजाताईंचा ठसा..

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजेंच्या मृत्युनंतर स्वराज्याचे रक्षण करत औरंगजेबाच्या सैन्यासोबतच स्वकीय विरोधकांना ही सळो की पळो करून सोडणारी महाराणी तारारा...

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने..

आज गुरुपौर्णिमा...  गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या शेकडो पोस्टांनी फेसबुक भरून गेलेले आहे . माझ्याही आयुष्यात मला घडवणारे अनेक गुरूजन लाभले , आई - वडिल - मोठा भाऊ यां...

संघर्षयात्रा विरुद्ध संसर्गयात्रा .

गोपीनाथ मुंडे ; महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात स्वयंकर्तुत्वाने आणि स्वाभिमानाने स्वतःचे अढळ स्थान निर्माण करणारा लोकनेता. तसं पाहता महाराष्ट्रात इतरांच्या पा...

महाराष्ट्राचे सर्वोत्तम गृहमंत्री : लोकनेते गोपीनाथराव मुंडे

गोपीनाथगड.... परळी वैजनाथ जवळील लोकनेते मुंडे साहेबांच्या या समाधीस्थळाला गेल्या दोन वर्षांपासुन १२ डिसेंबर रोजी भव्य यात्रेचे स्वरूप प्राप्त होत आहे. १२ डिसेंबर हा लो...