Skip to main content

*भगवानगडाचे गद्दार मंबाजी*

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य  निर्माण केलं पण त्यासाठी पोषक वातावरण हे शिवजन्मापुर्वीच्या संतांनी केलं होतं. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत सर्वांनीच कीर्तन प्रवचन च्या माध्यमातून लोकपदेश करत समाज जागृती केली . जाती व्यवस्थेत वाटल्या गेलेल्या समाजाला एकत्रित आणण्याचे पुण्यकार्य केले . ज्याचे फळ  अठरापगड जाती धर्मातील लोकांनी जीवाची पर्वा न करता स्वतःला स्वराज्यानिर्मीतीच्या कार्यात झोकून दिले ; प्रसंगी स्वराज्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली .

शिवाजीराजाला कधी न बघितलेली लोक पण त्या राजावर जिव ओवाळून टाकण्यासाठी तत्पर असत.  कारण शिवाजी राजाच्या कार्याची महती सर्वदूर पोहोचवण्याचे कार्य तुकारामांसारख्या संतानी केले आणि समाजात स्वराज्याविषयी  आस्था आणि आपलेपणाची भावना निर्माण केली .

स्वतः शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊनी अनेकवेळा अशा अनेकांचे सत्कार केले . संत तुकारामांची ख्याती ऐकून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना सत्कार स्वीकारण्यासाठी राजदरबारी येण्याचे आवाहन केले होते . पण तुकारामांनी ते प्रांजळपणे नाकारले होतं म्हणून शिवाजी महाराज स्वतः तुकारामांच्या भेटीला भरपूर संपत्ती आणि धान्य घेवून पोहोचले. अमाप संप्पत्ती घेवून स्वतः रयतेचा राजा दारी आलेला असताना तुकारामांनी ती संपत्ती स्वीकारण्यास नकार दिला. याप्रसंगी तुकारामांनी " सोनेरूपे आम्हा मृतिकेसमान, माणिक पाषाण खडे जैसे." आणि "आम्ही तेणे सुखी , म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी." असे काही अभंग पण लिहीलेले आहेत.

हे सर्व सांगण्याचा हेतू असा की राजसत्ता आणि अध्यात्मिक क्षेत्र एकत्र आले तर ते अनेकदा समाजाच्या उत्कर्षासाठी चांगले कार्य करू शकतात . भगवानगडावरून मुंडे साहेबांनी याचप्रमाणे कार्य केलेलं आहे. राज्यभरात पसरलेल्या समाजाला एकत्रित आणून समाज आणि भगवानगड दोघांचाही विकास आणि प्रसार केला . दोन चार जिल्ह्यांपुरता मर्यादित असलेला भगवानगड देशभर नावाजला तो फक्त आणि फक्त साहेबांमुळेच. परंतु मुंडे साहेबांच्या नंतर भगवानगडाचे महंत भरकटले आहेत.   शिवाजी राजांकडून मिळत असेलेली अमाप संपत्ती आणि सन्मान नाकारणारे तुकाराम महाराज कुठे आणि गोरगरीब ,कष्टकरी उसतोड कामगार लोकांनी भगवानगडाला दिलेल्या देणगीवर जगातील सर्व सुखांचा उपभोग घेणारे महंत नामदेव सानप कुठे असा प्रश्न पडतोय .

सर्व जातीधर्मांपर्यंत भगवानबाबांना मुंडे साहेबांनी पोहोचवले आणि आज नामदेव सानप गडाला जातीपुरतं मर्यादित करण्याचे पाप करत आहेत. भगवानबाबांना मानणाऱ्यांना एकत्रित आणण्याचे काम साहेबांनी केले आणि नामदेव सानप समाजाचे तुकडे करायला निघालेत .

नामदेव सानप हे महाराष्ट्रातील असे एकमेव महाराज असतील जे प्रत्येक वर्षी गोरगरीब लोकांनी दिलेल्या देणगीतून विदेशाच्या वारी करत असतात. त्यासाठी भगवान बाबांचे अनेक नेमाचे कार्यक्रमांना जायचे टाळतात . कार्यक्रम घेण्यासाठी आलेल्या लोकांना  किती देणगी देता असा प्रश्न विचारला जातो . आणि त्यानुसार जायचे का नाही ते ठरवले जाते ..

संत तुकारामांच्या परंपरेतील एकमेव आधुनिक संत म्हणुन भगवानबाबांचा ऊल्लेख केला जातो. " रान विका पण शिक्षण शिका" अशी शिकवन द-याखो-यातील दुबळ्यासमाजांना देणारे व आधुनिक शिक्षणाच्या संस्था, वसतीगॄहे जिल्ह्या जिल्ह्यात ऊभारणारे भगवानबाबा होते . तर त्यांच्या गादीवर विराजमान असलेले महंत नामदेव शास्त्री मात्र मंबाजी ची परंपरा चालवत असुन मी, माझ्यामुळे या अहंकाराने अंध झाले आहेत.

संतश्रेष्ठ तुकारामांच्या परंपरेतील संत भगवानबाबांनी दुबळ्या बहुजन समाजात शिक्षणाचे महत्व पटवुन दिले, कर्मकांडाला हरताळ फासुन समाज प्रबोधन केले.. या प्रबोधन झालेल्या समाजात राजकीय चेतना निर्माण करुन प्रचलित राजकीय ध्रुवांना आव्हान देणारे गोपीनाथराव मुंडे हे ओबीसी बहुजनांमध्ये देवत्व प्राप्त झालेले पहिलेच उदाहरण आहेत .

गोपीनाथ मुंडे असा एकेरी ऊल्लेख करुन गडाच्या विकासाच्या वल्गना करणारा महंत हे विसरलाय की कुठल्याही राजकीय नेत्याने गडाला दिलेली देणगी, निधी मुंडे साहेबांच्या निर्देशानुसारच होता.. मुंडे साहेबांपेक्षा गोविंद घोळवे यांचं योगदान अधिक असल्याचा महंत व त्यांची पिलावळ धादांत खोटा दावा करत आहेत. हे स्वार्थाने बरबटलेले , मस्तक गहाण ठेवुन साहेबांच्या परंपरागत हितशत्रुंचे हस्तक झालेले महंत समाजाची दिशाभुल करण्याचे पाप करत आहेत.

भगवान बाबांचे अनुयायी या आधुनिक मंबाजींचा बंदोबस्त करण्यास सक्षम आणि सज्ज आहेत..

~ ● *संदीप नागरगोजे , गंगाखेड* ● ~

Comments

Popular posts from this blog

पोटासाठी संत , झाले कलित बहुत

सध्या रामपाल नावाचा माणुस भारतीय मिडीयाची हेडलाईन झाला आहे . रामपाल , अासाराम , निरमल  असे नावात "राम" असलेले लोकं प्रत्यक्षात मात्र ह'राम' आहेतच परंतु दु:ख तर त्यावेळी होत जेंव्हा अशा लोकांसाठी भोळीभाबडी सर्वसामान्य जनता ढाल बनुन प्राणपणाने लढते . मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला .  कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले . सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका ...

नामांतर चळवळ आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे

२१ एप्रिल १९९४ रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेत एका ऐतिहासिक विधेयकावर चर्चा सुरू होती . हे विधेयक यासाठी ऐतिहासिक होते की  फक्त मराठवाड्यातीलच नाही तर संपूर्ण देशातील शोषित बहुजन समाजाची एक भावना होती की औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले जावे . संपूर्ण सभागृहात सर्वत्र शांतता होती , नामातंर चळवळीस मराठवाडय़ात उग्र रूप प्राप्त झाले होते .मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणे का गरजेचं आहे या विषयी सभागृहात एक आवाज घुमत होता. सर्व सदस्य शांतपणे महाराष्ट्राच्या या तरुण जिगरबाज योध्द्याचे भाषण ऐकत होते. तो आवाज होता लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा . आपल्या भाषणात ते म्हणतात "भारतीय राज्यघटनेने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य सामान्य, शोषित, दलित आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. समाजातील भेदभाव , अस्पृश्यता या विरोधात आवाज उठवाला . समाजातील आर्थिक विषमता दुर करण्यासाठी प्रयत्न केले. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर या शोषित समा...

गोष्ट नवी रित जुनी ....

                         राजकारणात नैतिकतेच्या गोष्टी नेहमीच विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून का केल्या जातात? सत्तेच्या शिखरावर पोहोचल्यानंतर मात्र या नैतिकतेला राज...