Skip to main content

कावळा उडे .... भुर्रर्रर्र ...

राजकारणाचे जाळं फारच किचकट असतं . या जाळ्यात साधारणपणे फक्त लहाण मासे च गळाला लागत असतात आणि मोठमोठे मगरमच्छ मात्र हे जाळं कुरतडून पसार होत असतात . ते मगरमच्छ जाळं कुरतडण्याएवढे पावर फुल असतात की सत्तेत बसलेले काही त्यांचे दोस्त त्यांना त्याकामी विशेष सहाय्य करतात हा संशोधनाचा विषय आहे .

ज्याप्रमाणे माल्यावर आपल्या देशातील बँका उदार होऊन महारथी कर्णाप्रमाणे कर्जाची उधळण करत होत्या त्याप्रमाणे आम्हाला आमचा किराणा दुकान वाला दुकानदार सुध्दा उधारी देत नाही . माल्याची ग्लॅमर जीवन पध्दती बघुन  अनेक लोकांना  त्याचा हेवा वाटत असेल . जेव्हा माल्या विश्वातील वेगवेगळ्या विश्वसुंदर्यांना बगलेत घेवुन बसायचा त्यांच्यावर यथेच्छ उधळण करायचा ते देशातील नागरिकांना सहज नजरेस पडायचे परंतु ही बाब देशातील कोणत्याही राजकारणी , मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानाच्या डोळ्यांना दिसली नाही .

माल्याची विमानकंपनी डबघाईला येवुन तिचं दिवाळं निघालं असताना देखील बँकांनी त्याच्यावर कर्जाची उधळण सुरूच ठेवली होती आणि आता जेंव्हा तो फरार झालाय तेंव्हा सर्वच एकमेकांच्या सुरात सुर लावुन बोंबा ठोकायला लागले आहेत .

आपले अर्थमंत्री सांगतात कि माल्याला कर्ज काँग्रेसच्या काळात भेटले . ते मान्य सुध्दा आहे . पण मंत्री महोदय माल्या तुमच्या नाकावर टिच्चून पळाला त्याचं काय ?

भारतातील सर्वसामान्य नागरिक जेंव्हा घरासाठी कर्ज काढायला बँकेच्या चकरा मारतो तेंव्हा बँकेवाले त्याच्याकडे असं बघतात जसं त्या व्यक्तीचा कर्ज घ्यायचा आणि त्यावर ऐश करून कर्ज बुडवण्याचा खानदानी व्यवसायच तो व्यक्ती करतो ..

असो बाकीच्यांचे सोडा मात्र ५६ इंचाची छाती असलेल्या पंतप्रधानांकडुन तरी हि अपेक्षा नव्हती. मी जनतेच्या घराचा चौकीदार बनुन राहील असं म्हणणार्‍या प्रधानसेवका समोरून हा माल्या रूपी डोमकावळा फरार झाला तरी प्रधानसेवक काहीच करू शकले नाहीत. माल्या डोमकावळा होवुन उडून जात असताना हे चौकीदार महाशय झोप घेत होते की श्री श्री श्रींच्या कार्यक्रमात जास्तच तल्लीन झाले होते काही कळायला मार्ग नाही.

- संदीप नागरगोजे, गंगाखेड

Comments

Popular posts from this blog

पोटासाठी संत , झाले कलित बहुत

सध्या रामपाल नावाचा माणुस भारतीय मिडीयाची हेडलाईन झाला आहे . रामपाल , अासाराम , निरमल  असे नावात "राम" असलेले लोकं प्रत्यक्षात मात्र ह'राम' आहेतच परंतु दु:ख तर त्यावेळी होत जेंव्हा अशा लोकांसाठी भोळीभाबडी सर्वसामान्य जनता ढाल बनुन प्राणपणाने लढते . मध्ययुगात असाच काहीसा प्रसंग पाश्चात्य राष्ट्रांमध्ये सुध्दा आला होता . ख्रिस्ती लोक अन्यायी , अत्याचारी कर्मकांडी धर्मगरुंच्या शोषणाला बळी पडलेले असताना मीर्टीन ल्युथर किंग यांनी लँटीन भाषेतील असलेल्या बायबल ग्रंथाचे भाषांतर करुन सर्वसामान्यांसाठी ते खुले करुन धर्मगुरुंच्या वर्चस्वाला छेद देत " प्रोटेस्टंट " नावाचा ख्रिस्ती धर्मात नवीन गटच. िर्म निर्माण केला .  कर्मठांचे सर्व उद्द्योग त्याला माहीती असताना त्याला आगोदर बायबलचे भाषांतर करुन लोकांना बायबलची शिकवण काय आहे ? ाआणि धर्मगुरुंच आचरण कसं आहे हे दाखवण्याचे कष्ट घ्यावे लागले . सुदैवाने आपल्याला आपल्या पुर्वजांनी आगोदरच आपल्यासाठी ते कष्ट सहन केले आहेत . धर्माच आचरण कसं आसावं ? हे सांगितलेले आहे. विशेषत: "असे" प्रसंग समोर येण्याचा संभावीत धोका ...

नामांतर चळवळ आणि लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे

२१ एप्रिल १९९४ रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेत एका ऐतिहासिक विधेयकावर चर्चा सुरू होती . हे विधेयक यासाठी ऐतिहासिक होते की  फक्त मराठवाड्यातीलच नाही तर संपूर्ण देशातील शोषित बहुजन समाजाची एक भावना होती की औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव दिले जावे . संपूर्ण सभागृहात सर्वत्र शांतता होती , नामातंर चळवळीस मराठवाडय़ात उग्र रूप प्राप्त झाले होते .मराठवाडा विद्यापीठाला भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणे का गरजेचं आहे या विषयी सभागृहात एक आवाज घुमत होता. सर्व सदस्य शांतपणे महाराष्ट्राच्या या तरुण जिगरबाज योध्द्याचे भाषण ऐकत होते. तो आवाज होता लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा . आपल्या भाषणात ते म्हणतात "भारतीय राज्यघटनेने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्य सामान्य, शोषित, दलित आणि वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. समाजातील भेदभाव , अस्पृश्यता या विरोधात आवाज उठवाला . समाजातील आर्थिक विषमता दुर करण्यासाठी प्रयत्न केले. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर या शोषित समा...

गोष्ट नवी रित जुनी ....

                         राजकारणात नैतिकतेच्या गोष्टी नेहमीच विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून का केल्या जातात? सत्तेच्या शिखरावर पोहोचल्यानंतर मात्र या नैतिकतेला राज...