••• २०१४ संक्षीप्त डायरी ••• आणि ••• २०१५ नवीन वर्षासाठी संकल्प •••• २०१४ हे खुप सारे अनुभव दिलेलं वर्ष , खुप काही शिकवुन गेलेलं वर्ष . मित्रांनो खर सांगायच झालं तर जीवनातील प्रत्येक दिवसच काय प्रत्येक क्षण हा एकदाच येत असतो परंतु बहुदा नवीन वर्ष सुरुवात होत असताना दिवस कसे निघुन गेले याची अवलोकन करण्याची संधी येते , वर्षभर केलेली कामे , घडलेल्या घटना , झालेल्या चुका यांच सिंहावलोकन करुन योग्य ते उपाय करण्याची योजना बनवता येते . माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर हे वर्ष खुप अनुभवमिश्रीत ठरलं वेळोवेळी माझ्या मित्रांनी , मार्गदर्शकांनी मला सहकार्य केलं योग्य ते सल्ले दिले माझ्या जीवनातील नव्या टप्यात मी चांगल्या प्रकारे जम बसवण्यात यशस्वी झालो ते माझ्या मित्र आणि हितचिंतकांमुळेच त्यांचा मी आभार मानण्यापेक्षा सदैव त्यांच्या ऋणातच राहणे पसंद करीन . सर्वांचे नाव लिहीण्याची मनापासुन इच्छा आहे परंतु यादी खुप मोठी असल्याने लिहीनं शक्य नाही . त्याच बरोबर ३ जुन २०१४ हा आयुष्यात कधीच विसरता न येणारा दिवसही याच वर्षातला या दिव...
सत्य आम्हा मनी, नव्हे गबाळाचे धनी, देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे.