छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं पण त्यासाठी पोषक वातावरण हे शिवजन्मापुर्वीच्या संतांनी केलं होतं. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत सर्वांनीच कीर्तन प्रवचन च्या माध्यमातून लोकपदेश करत समाज जागृती केली . जाती व्यवस्थेत वाटल्या गेलेल्या समाजाला एकत्रित आणण्याचे पुण्यकार्य केले . ज्याचे फळ अठरापगड जाती धर्मातील लोकांनी जीवाची पर्वा न करता स्वतःला स्वराज्यानिर्मीतीच्या कार्यात झोकून दिले ; प्रसंगी स्वराज्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली . शिवाजीराजाला कधी न बघितलेली लोक पण त्या राजावर जिव ओवाळून टाकण्यासाठी तत्पर असत. कारण शिवाजी राजाच्या कार्याची महती सर्वदूर पोहोचवण्याचे कार्य तुकारामांसारख्या संतानी केले आणि समाजात स्वराज्याविषयी आस्था आणि आपलेपणाची भावना निर्माण केली . स्वतः शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊनी अनेकवेळा अशा अनेकांचे सत्कार केले . संत तुकारामांची ख्याती ऐकून राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना सत्कार स्वीकारण्यासाठी राजदरबारी येण्याचे आवाहन केले होते . पण तुकारामांनी ते प्रांजळपणे नाकारले ह...
सत्य आम्हा मनी, नव्हे गबाळाचे धनी, देतो तीक्ष्ण उत्तरे, पुढे व्हावयासी बरे.